शाळेतल्या अभ्यासक्रमाबरोबरच तो नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचीही कसून तयारी करत होता. त्या परीक्षेला पुढील इयत्तांचे गणिताचे प्रश्न असायचे. त्याचे गणिताचे शिक्षक सुद्धा खूप छान पद्धतीने शिकवत असल्यामुळे त्याचं गणित एकदम उत्तम होतं. त्याच्या गावातील वयाने मोठे असणाऱ्या १-२ मित्रांकडून सुद्धा त्याने मार्गदर्शन घेतलं होतं. वर्गातील गृहपाठ वगैरे काही तो करत नसायचा. शिक्षकांना त्याने सांगितलं होतं की, मी नवोदयची तयारी करत असल्यामुळे मला शाळेतील अभ्यासाला जास्त वेळ मिळत नाही. त्यामुळे शिक्षक त्याला शिक्षा करत नसायचे. पण एवढ्या कष्टाने, जिद्दीने तयारी करूनही तो नवोदयच्या यादीत क्रमांक मिळवू शकला नाही. त्याच्याबरोबरच उन्हाळी तासात पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या त्या 'अ' तुकडीतील मित्राला मात्र प्रवेश मिळाला. तो यामुळे खूपच निराश झाला. मित्रांनी नवोदयचं विचारलं की, ते सांगताना त्याच्या डोळ्यांत आपोआप पाणी यायचं.
इकडे मात्र ती दररोज त्याला जागा पकडायची. दोघे एकाच सीटवर बसून गप्पा मारत घरी जायचे. शाशिच्या तासाला दोघे एकमेकांकडे पाहत एकमेकांची थोडीशी चेष्टा करत, बोलत बोलत पूर्ण मैदान फिरून यायचे. तो सुरपाट, कबड्डी, खो-खो खेळताना ती दूर झाडाखाली थांबून त्याला पाहत रहायची. तोही मग मुद्दाम तिच्याकडे पाहत तिला इम्प्रेस करण्यासाठी इतर मुलांवर दादागिरी वगैरे करायचा. सर्व खेळांत मग कर्णधार पद तो स्वतःकडेच घ्यायचा. त्याच्या आईला शिवायचं नसेल तेव्हा ती त्याला स्वतःचा डबा खायला द्यायची. कधीकधी तर तीच्या मैत्रीणींसोबत तो तीच्या गटात एकटाच जेवायला जायचा. तो गणितात हुशार असल्याने ती त्याच्यापेक्षा २ वर्षांनी मोठी असूनही तो तिची गणितं तीला समजावून सांगायचा. असंच आनंदात, मजेत एकेक दिवस पुढे सरकत होता.
ती आठवीत आणि तो सहावीत होता, तेव्हा ५वी ते ८वी शाळा दुपारच्या सत्रांत असायची. ती नववी आणि तो सातवीत गेल्यानंतर ५वी ते ७वी दुपारी आणि ८वी ते १०वी सकाळच्या सत्रांत, असं वेळापत्रक त्यांना सोयीस्कर असंच बदललं होतं. तो सातवीत असताना ती नववीत होती, त्यावेळी शाळेची वेळ वेगवेगळी असल्यामुळे त्यांना काही जास्त भेटता येत नव्हतं.
सातवीच्या वार्षिक परीक्षेत एका गुणामुळे त्याला प्रथम क्रमांक मिळू शकला नाही. त्याला नवोदयमध्ये यश मिळालं नव्हतं. मात्र त्या जीव लावून केलेल्या अभ्यासामुळे त्याला सातवीच्या शिष्यवृत्ती, आठवीच्या NMMS परीक्षेत अभ्यास न करताही यश मिळालं होतं. केलेला अभ्यास कधीच वाया जात नाही, हे मात्र त्याला आता पक्कं समजलं होतं. ती दिसायला सुंदर होती, मात्र अभ्यासात मध्यमच होती. तो अभ्यासात खूप हुशार आणि ती दिसायला खूप सुंदर असल्याने सर्वांमध्ये साहजिकच त्यांच्या मैत्रीची चर्चा चांगलीच रंगली होती. तीच्या वर्गातील काहीजण तर त्याला उपहासाने विचारायचे की, "व्हंय. तीनं तुला प्रपोज केलाय काय ?" तो मात्र 'नाही' म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचा.
तो आठवीत गेल्यानंतर त्याच्या शिष्यवृत्तीच्या पैशांमध्ये वडिलांनी अजून पैसे टाकून त्याला अँड्रॉईड फोन घेऊन दिला होता. ती दहावीत होती. तीही तीच्या वडिलांच्या व्हॉट्स अपवरून वडिलांच्या नकळत त्याच्याबरोबर बोलत होती. आठवीत आल्यापासून त्याच्यात पौगंडावस्थेची लक्षणं दिसायला लागली होती. त्याला आता तिच्याबद्दल शारिरीक आकर्षण सुद्धा वाटत होतं. तीला तर तो पहिल्यापासूनच आवडत होता. तो आता व्यवस्थित टापटीप राहत होता. कपड्यांना इस्त्री करायचा, सारखं सारखं कंगव्याने केस विंचारायचा, रूमालात पावडर ठेवायचा, दररोज शाळेत जाताना बूट स्वच्छ पुसल्याशिवाय घालत नव्हता. तीच्याही चेहऱ्यावर थोड्याशा तारूण्यपिटीका आल्या होत्या. शरीराला आकर्षक आकार प्राप्त झालेला होता.
प्रथम सत्राच्या काही दिवस अगोदर तो आणि त्याचे मित्र स्टँडवर बसले होते. ती आणि तीच्या मैत्रीणीही होत्या. आता मात्र दोघेही घरी जायची घाई करत नव्हते. एकमेकांचा हातात हात घेऊन भविष्याची आशादायक चित्रेही ते कधीकधी रंगवत होते. त्यादिवशी तीच्या वर्गातील काही मुलं मुद्दाम त्याच्या नावाने तीला चिडवत होते. दुसऱ्या दिवशी, तीने प्राचार्यांकडे त्या मुलांची तक्रार केली. प्राचार्यांनी त्या मुलांना ताकीद दिली. नंतर त्यांच्यातील एकजण त्याला येऊन म्हणाला, "काय लका, आधी नाय का सांगायचं. ती तुझी बहीण लागते म्हणून!" तो काहीही न बोलता तिथून निघून गेला. मित्रांबरोबर आणि घरीही आता तो कोणाला जास्त बोलत नव्हता. एकएकटा राहत होता. तो तीला टाळायला लागला. तीच्यापासून दूरदूर रहायला लागला होता.
एका आठवड्याने दुपारी तीचा फोन आला आणि तीने विचारलं, "का रे असं वागतोयंस ?"
तो :- मी भाऊ आहे तुझा ??
ती :- हो...
तो :- मग ठेवतो मी फोन. 😡😠
ती :- अरे थांब... गंमत केली यार... 😃
तो :- मी तुझ्याकडे कधीच बहीण म्हणून पाहिलं नाही. 😥
ती :- अरे मग, मी काय सांगणार होते सरांना ? मी मुद्दाम त्यांना खोटं सांगितलं. 😇
तो :- खरं म्हणतीयेस ना तू ?
ती :- हो रे बाबा. 🤗
तो :- I really love you ❤ very much dear.
ती :- मला पण तू खूप आवडतोस रे. Same to you my heartbeat.
प्रथम सत्राची परीक्षा झाली. दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या. तो हुशार आहे आणि आम्ही दोघे मित्र आहोत, हे तीने तीच्या आईला सांगितलं होतं. तीच्या आईने त्याला दिवाळीचा फराळ खायला आणि घर पहायला बोलवलं. हुशार आहे म्हटल्यावर आपल्या मुलीला अभ्यासाचं सुद्धा काहीतरी सांगेल, हा भाबडा आशावादही तीच्या आईच्या मनात होताच. तो तीच्या घरी गेला. बाहेरून त्याने हाक दिली. तीच्या मोठ्या भावाने दार उघडलं. तो डिप्लोमाला होता. इतक्यात ती आली आणि तीने त्याला आत घेतलं. तीच्या आईने त्याला फराळ दिला. त्याला फराळ जास्त आवडत नव्हता, पण तीच्या कुटुंबियांबरोबर बोलत बोलत त्याने कसाबसा तो संपवला. काही वेळेनंतर तीचे वडील आणि भाऊ शेतात गेले. ती त्याला म्हणाली, "चल तुला टेरेस दाखवते". काहीही न बोलता तोही शांतपणे तीच्या मागोमाग टेरेस वरती गेला.
ब्लॅक नाईट पँट आणि पिंक टी-शर्ट, मोकळे सोडलेले आणि टेरेस वरती वाऱ्यामुळे उडणारे तीचे ते कुरळे केस यामुळे ती खूपच सुंदर दिसत होती. तो तिच्याकडे एकटक पाहत ऊन्हातच थांबला होता. ती लहान आवाजात त्याला म्हणाली, "अरे वेड्या... माझ्याकडे काय पाहतोयस! ऊन्हाने पाय भाजत असतील ना! त्याने फक्त नकारार्थी मान डोलावली. तीने त्याला एका हाताने तीच्या आत असणाऱ्या अभ्यासाच्या खोलीत ओढलं आणि तीला काही कळायच्या आत त्याने त्याचे 👄💋 ओठ तीच्या ओठांवर टेकवले. तीने डोळे मिटून घेतले. त्याने तीचा दुसरा हात हातात घेतला आणि ओठात ओठ घालून तो तीच्या रसाळ ओठांचा आस्वाद घेऊ लागला. पायऱ्यांवरून कोणीतरी वरती येत असल्याचा तीला आवाज आला आणि तीने त्याला दूर सारलं. अनपेक्षित आणि इतक्या चटकन घडलेल्या या प्रसंगाने तो भलताच खूष झाला होता, तर तीची धाकधूक वाढलेली होती. तो लगेच तिथून त्याच्या घरी निघून गेला.
आता मात्र दोघांच्याही अंतिम परीक्षा जवळ आल्या होत्या. दोघेही भरपूर अभ्यास करायला लागले. परीक्षा झाली. त्याला यावेळी ७ गुणांनी प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता. तीचा परीक्षा क्रमांक आणि आईचे नाव त्याला माहित असल्याने त्याने स्वतःच्या मोबाईलवर तीचे गुण पाहिले. तीला ८९.३४℅ मिळाले होते आणि विशेष म्हणजे, गणितात ९४ गुण होते. तीचा शाळेत पाचवा आणि गणितात प्रथम क्रमांक आला होता. त्याने लगेच तीला अभिनंदन करण्यासाठी फोन केला, पण फोनच लागेना. तो दिवसभर फोन लावत राहिला, पण फोन संपर्कक्षेत्राच्या बाहेरच. तो दुसऱ्या दिवशी तीच्या घरी जाऊन आला, तर घरालाही कुलूप. बक्षीस वितरण समारंभालाही ती आली नाही. त्याने तीच्या सर्व मैत्रीणींना विचारलं, पण त्यांनाही काहीच माहिती नव्हतं. त्याने आतापर्यंत कित्येक वेळा तीला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर वर शोधलं. पण खिन्न मनाने, 😓 वेड्यासारखा तीचा शोध तो अजूनही घेतोय.
------------ कथामालिका समाप्त ------------
- प्रतिक दत्तलता होले
Mast pratik
ReplyDelete😍💓👍
ReplyDelete