का शिवायचं नाय ? असा जर प्रश्न लहाणपणी विचारला, तर उत्तर मिळायचं की; कावळा शिवून गेलाय. बरं! मग कधी रात्रीच्या वेळी असं शिवायचं झालं, तर प्रश्न पडायचा. 🤔 रात्रीचं कसा कावळा येत असेल ?
नंतर मित्रांकडून काही माहिती मिळाली. १२ वीच्या जीवशास्त्राच्या पुस्तकात ज्याला 'मासिक पाळी' (menstruation) म्हणतात, त्याबद्दल शास्त्रीय आणि खरी माहिती मिळाली. ती अशी की, वयाच्या १३ ते १५ वर्षांपासून मुलींमध्ये हे सुरू होतं. महिन्यातून २ ते ७ दिवस स्त्रीच्या योनीतून रक्तस्राव होतो.
आता येवूया मूळ मुद्द्याकडे...
असं जर असेल आणि हे नैसर्गिकरीत्या घडत असेल, तर मग मुलींनी वेगळं बसायची प्रथा का ? त्याचे फायदे-तोटे काय ?
माझ्या मते, पूर्वीच्या काळी आतापेक्षा स्रियांना शेतातील आणि घरातील अशी खूप कष्टाची कामं असायची. पण या मासिक पाळीच्या दरम्यान मुलींना थकवा जाणवतो. तसेच, पोटदुखी आणि पाठदुखीही जाणवते. त्यामुळे त्यांना आराम मिळावा, म्हणून ही प्रथा असू शकते. दुसरी शक्यता म्हणजे, या मासिक पाळीमुळेच स्त्रियांच्या अंडाशयाची वाढ होत असते, जे की गरोदर राहण्यासाठी आवश्यक असतं. पण या दरम्यान जर शरीरसंबंध ठेवले, तर ते धोकादायक ठरू शकतं. म्हणून काहीशा वेगळ्या स्वरूपात लांब राहण्याची प्रथा असेल.
मला काय म्हणायचं आहे ?
मी हे लिहिलं, यासाठी की ज्या स्रिया वयोवृद्ध आहेत किंवा ज्यांचं लग्न होवून काही वर्ष झाली असतील, त्यांना वेगळं रहायचं काही वाटत नसेल. पण ज्यांना नुकतंच हे सुरू झालेलं आहे आणि ज्या मुली तरूण आहेत, त्यांना या गोष्टीची लाज वाटते. घरी कोण आलं, तर चारचौघात न मिसळता त्यांना वेगळं बसावं लागतं. इतर वेळी, सर्वांबरोबर मिळून खेळता येतं. मात्र, आता वेड्यागत नुसतं एकटीने बसायचं. त्यात महत्वाचं म्हणजे, थंडी असली तरी त्यांना अंथरूण वगैरे थोडंच मिळतं, कारण शिवल्यामुळे ते नंतर धुवावं लागतं. एक माणूस म्हणून, ही खरंच खूप लाजीरवाणी गोष्ट आहे.
गैरसमज -
शिवताशिवत केली की, घरात गोम, विंचू निघतात.😂
हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे, ते पाळावं लागतं. मग माझा प्रश्न, १) पहिलं नवरा मेल्यानंतर बायकोलाही जिवंतपणे तीच्या मुलांसमोर जाळायचे.
२) पहिलं मुलींना शिक्षण देणं, म्हणजे पाप होतं.
३) दवाखान्यात गेल्यावर आणि सुई टोचल्यावर विटाळ व्हायचा.
अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्या काळानुसार बदलल्याच ना ? काळानुसार आपल्यामध्ये बदल करत जाणं, यालाच तर 'उत्क्रांती' म्हणतात ना. कोणत्याही गोष्टी अंधपणाने स्वीकारण्यापेक्षा त्याची शहानिशा करायला हवी. मानवतेच्या दृष्टीकोनातून त्या गोष्टीकडे पहायला हवं. घरच्यांशी या बाबतीत स्पष्टपणाने बोलायला हवं. आपल्यावर लादलेली अन्यायकारक गोष्ट निमूटपणानं सहन करणं, हे एकप्रकारे गुलामगिरीचंच लक्षण आहे.
- प्रतिक दत्तलता होले
Nice brother...
ReplyDeleteKeep it up
Thank you. Your name Pls.
Deleteचांगले विचार आहेत..चालू राहु द्या👌
ReplyDeleteThank you. Your name Pls.
DeleteImpressive Bro 👍
ReplyDeleteBest 👍 keep it up
DeleteThank you. Your name Pls.
DeleteThis comment has been removed by the author.
DeleteThis comment has been removed by the author.
Deleteछान... समाज माध्यमाबरोबरच आजूबाजूला याबाबत जनजागृती करूया... खूप खूप सदिच्छा
ReplyDeleteHo, nakkich. Your name pls.
DeleteGreat pratik☺👍👍👍
ReplyDeleteThank you
DeleteThat is called hegimony
ReplyDeleteS. Thank you
DeletePratik khup chan lihal ahe
ReplyDeleteThank you. Your name pls.
DeletePratik khup chan lihal ahe
ReplyDeleteThank you. Your name pls.
DeleteOk, doing good activity keep it up
ReplyDeleteThank you. Your name pls.
DeleteKeep it up Pratik
ReplyDeleteThank you bro.
Deleteखुप छान विचार मांडले आहेत.प्रत्येकजण जर असा विचार करेल तर समाजात बदल होण्यास वेळ नाही लागणार.
ReplyDeleteThank you. Your name pls.
DeleteNice Keep it up👍👍
ReplyDeleteकाय लीहतोस भाऊ तू....1No.👌👌
ReplyDeleteKhupch chan pratik..ase lekh jr samajat prasarit zale tr nakkich lavkrch badal ghadun yeil...आणि ज्या आपल्या समाजात अनिष्ठ रूढी परंपरा ज्या पुर्वीपासुन चालत आहेत त्या नष्ट होण्यास मदत होईल....
ReplyDeleteकुणाल खताळ
बरोबर आणि चूक दोन्ही बाजू मंडल्याने लिखाण छान। बरेच ब्लॉग हे एकतर्फी असतात । इथून पुढील ही आपल्या लिखाणात अशाच प्रकारचा संदर्भ असावा अशी सदिच्छा।
ReplyDeleteOtherwise best / better writing and your writing skill
Yes it's natural things that occur during puberty and stop during age of 50 yrs ..u take a strong point about that I am also biology student so I also know about that but some people are educated but they take that differently and treat badly ..u make it blog about menstruation and educating people are more respectable and much thankful work u do ...that's really good.i am proud of u brother ❤️💗💗 u and I think that u are true writer.
ReplyDelete