उद्या महात्मा फुले यांची जयंती. [ज्यांनी मी पाठविलेला "महात्मा फुले यांच्या जन्मतारखेचा शोध" हा प्रा. हरी नरके यांचा लेख वाचला नसेल, त्यांना महात्मा फुले यांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही. कारण जर जन्मतारखेचा शोधच लावला नसता, तर तुम्ही जयंती कशी साजरी करणार ???]
१) १८७६ ते १८८२ या काळात महात्मा फुले पुण्याचे आयुक्त (कमिशनर) होते.
२) महाराष्ट्रामध्ये जातीभेद निर्मूलनाचं काम पहिल्यांदा महात्मा फुले यांनी केलं होतं.
३) महात्मा फुले यांनी अत्यंत उत्कृष्ट असे रस्ते, कालवे, तळी, पूल, बोगदे त्यांच्या 'पुणे कमर्शियल कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी' मार्फत बांधले. ज्यात पुणे-सातारा महामार्गावरील कात्रजचा बोगदा, खडकावासला धरणाचे कालवे, आताची महात्मा फुले मंडई, येरवड्याचा बंडगार्डनचा पूल यांचा समावेश होतो.
४) जातीभेद निर्मूलनासाठी आपल्या घरातील विहीर अस्पृश्यांना पाणी पिण्यासाठी खुली केली.
५) त्याकाळी ब्राह्मण समाजात मुलींचं विवाहाचं वय कमी आणि मुलांचं खूपच जास्त असायचं. कधीकधी आजारपणामुळे मुलाचा लवकर मृत्यू व्हायचा. मग त्या मुलीला अगदी तरूणपणापासूनच म्हातारपणापर्यंत एकटीला जीवन घालवावं लागायचं. ज्यामुळे तीची शारीरिक भूक मरून जायची. म्हणून त्यांनी ब्राह्मण विधवांचा पुनर्विवाह घडवून आणला.
६) महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना स्वतःला मूल नव्हतं. म्हणून मग त्यांनी एका ब्राह्मण विधवेचं मूल (यशवंत) दत्तक घेतले. त्याला शिक्षण देऊन डॉक्टर बनविलं आणि त्याचे आंतरजातीय लग्न लावून दिलं.
७) शिवरायांचं पहिलं मराठी पुस्तक महात्मा फुले यांनी १८६९ साली लिहून प्रकाशित केलं. १८८० साली रायगडावर शिवरायांची समाधी शोधून सर्वांत पहिल्यांदा पुण्यामध्ये त्यांनीच स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजातर्फे शिवजयंती साजरी केली.
८) सर्वांत महत्वाचं म्हणजे 'देव' ही संकल्पनाच महात्मा फुले यांनी पूर्णपणे नाकारली होती.
महात्मा फुले यांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली -
का ??? तर ज्या महात्मा फुले यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य जातीभेद निर्मूलनासाठी व्यतीत केले, आज त्याच बहुजन विशेषतः माळी समाजातील लोकच जातीला प्रमाणाबाहेर चिकटून बसले आहेत. ज्या महात्मा फुले यांनी स्वतःच्या दत्तक मुलाचं आंतरजातीय लग्न लावून दिले, पण आज त्यांच्याच समाजातील लोक जातीच्या बाहेर लग्न करायला तयार नाहीत. ब्राह्मण समाजाने तयार केलेली जातीची उतरंड ते घट्टपणे पकडून बसले आहेत. माळी समाजातील लोक मांग, महार, चांभार यांना खालचं समजतात. चांभार समाजाची लोक मांग, महार यांना खालचं समजतात. मांग महारांना खालचं समजतात. ही वास्तविकता आहे. यावर भर म्हणजे बाबासाहेब स्वतः म्हणाले होते की, जे लोक सुधारणांचा उपयोग घेऊन श्रीमंत झालेत, तेच आता अस्पृश्यांतील नवीन ब्राह्मण झालेत. धनगर जर असतील तर ते त्यामध्ये पण हटकर, शेगर या त्यांच्यातले त्यांच्यातच विवाह करतात. मराठा ९६ कुळी, ९२ कुळी या त्यांच्या समाजातच विवाह करतात. म्हणजे पहिलं धर्म, त्यानंतर जात, परत पोटजात, परत गरीब-श्रीमंत इतकं समाजाचं विभाजन झालंय.
दुसरं म्हणजे, देव ही संकल्पनाच महात्मा फुले यांनी पूर्णपणे नाकारली होती. कारण त्यांचे असे मत होते की, देव-धर्माच्या नावाखाली ब्राह्मण समाज बहुजन समाजाचं शोषण करतो. म्हणून तर त्यांनी 'सत्यशोधक' समाजाची स्थापना केली. पण आज अशी किती कुटुंब सापडतील बहुजन आणि माळी समाजात ज्यांच्या घरात देव-देवता नाहीत ? उलट सर्वांत जास्त देव-धर्म आणि कर्मकांड (जागरण, गोंधळ, जत्रा) यांत माळी समाज गुरफटलेला आहे. पण एक नम्रपणे सांगू इच्छितो की, जर तुम्ही महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना आणि देव-देवतांना एकत्र घरामध्ये ठेवत असाल, पूजत असाल तर तो त्या महापुरूषांचा खूप मोठा अपमान आहे. महत्वाचं म्हणजे, तुम्हाला त्यांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही.
महात्मा फुलेंना आज त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करत असतांना जातीजातींत आणि आर्थिक विषमतेत विभागलेल्या समाजाला मानसिक गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी किमान आम्ही गुलाम आहोत याचे भान आले तरी पुष्कळ झाले.
- प्रतिक दत्तलता होले
खूप छान व अचूक मांडणी केली आहे. तुझा ब्लॉग वाचून लोकांमध्ये नक्कीच काहीतरी परिवर्तन घडून येईल अशी आशा करायला हरकत नाही.. (Kabir Banside)
ReplyDeleteहा एक सुंदर लेख आहे ज्यात महात्मा फुलें बद्दल काही माहित नसलेले facts कळले । व आता समाजात काय घडत आहे याची जाणीव सुद्धा झाली । (विजवर्धन माळगे)
ReplyDeleteविचार करायला लावणारे खूप सुंदर विचार आहेत प्रतिक .
ReplyDeleteसमाजामधील त्यावेळच्या आणि आता च्या परिस्थितीतील साम्य
आणि वेगळे पण दिसून आले.(आकाश फडतारे)
विचार करायला लावणारे खूप सुंदर विचार आहेत प्रतिक .
ReplyDeleteसमाजामधील त्यावेळच्या आणि आता च्या परिस्थितीतील साम्य
आणि वेगळे पण दिसून आले.(आकाश फडतारे)
छान प्रतीक,अस वाटत की जर ह्या सर्व गोष्टींचा अवलंब जर सर्व बहुजनांनी केला तर निश्चितच सर्व महा पुरुषांना ही एक आदरांजली ठरेल (ऋत्विक लोंढे)
ReplyDeleteअतिशय सुंदर लेख (योगेश क्षीरसागर)
ReplyDeleteप्रतीक सर अतिशय छान लेखन...महात्मा फुले यांच्या बद्दल आपण अनेक अर्थाने अनभिज्ञ असताना अनेक पैलू तुम्ही उलगडून दाखवले.(चैतन्यकुमार देवकर)
ReplyDeleteमस्त लिहले भाऊ😍👌👌👌
ReplyDeleteसर अति उत्तम उद्या जयंती निमित्त सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचलीच पाहिजे.महात्मा जोतिबा फुले ह्याचे कार्य खूप छान प्रकारे तुम्ही मांडले.
ReplyDeleteसर अति उत्तम उद्या जयंती निमित्त सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचलीच पाहिजे.महात्मा जोतिबा फुले ह्याचे कार्य खूप छान प्रकारे तुम्ही मांडले.(रोहित अंभोरे)
ReplyDelete